ETV Bharat / sitara

अधिकृत घोषणा; या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'कलंक' - sanjay dutta

रिलीज डेटसोबतच चित्रपटाच्या टीझरविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. १२ मार्चला या चित्रपटाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कलंक
author img

By

Published : Mar 9, 2019, 12:51 PM IST

मुंबई - आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कलंक' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात गुरुवारपासून या चित्रपटातील कलाकारांचे लूक प्रदर्शित करण्यात आले.

आता या पाठोपाठ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली गेली आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त होते, मात्र आता ही रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

रिलीज डेटसोबतच चित्रपटाच्या टीझरविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. १२ मार्चला या चित्रपटाचा खास टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे, तर करण जोहरची निर्मिती आहे.

Intro:Body:

neha gadres wedding photographs 

पाहा, नेहा गद्रेच्या विवाहसोहळ्याचे खास फोटो 

मुंबई - मन उधाण वाऱ्याचे या मालिकेने एकेकाळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि मालिकेसोबतच कलाकारांनाही. यात मुख्य भूमिका असलेल्या नेहा गद्रेने तर अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. आता हीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 

नेहाने नुकतंच बॉयफ्रेंड ईशान बापटसोबत लग्नगाठ बांधली आहे. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबातील काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आता लग्नातील काही फोटो आपल्या चाहत्यांना पाहता यावे यासाठी नेहाने ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

नेहाने आपल्या मेहंदी, रिसेप्शन आणि लग्नसोहळ्यातील ईशानसोबतचे काही फोटो आपल्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.