मुंबई - जोकर या बहुचर्चित हॉलिवूड चित्रपटाची सध्या जगभर भरपूर चर्चा आहे. या सिनेमाला ऑस्करमध्ये तब्बल ११ पुरस्कार मिळाले. जगभरातील गोल्डन ग्लोब अवॉर्डपासून अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी जोकरचा गौरव झाला. हा चित्रपट आता भारतात पुन्हा रिलीज होणार आहे.
भारतात हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज झाला होता. मात्र ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ११ पुरस्कारावर जोकरने मोहर उमटवल्यानंतर या चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता भारतात आहे. वॉर्नर ब्रदर्सचा हा जोकर पुन्हाएकदा १४ फेब्रुवारीला भारतात री-रिलीज होणार आहे.
-
He's back... Warner Bros Pictures to *re-release* #Joker on 14 Feb 2020 in #India. #JokerMovie pic.twitter.com/4BlPoizI6M
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">He's back... Warner Bros Pictures to *re-release* #Joker on 14 Feb 2020 in #India. #JokerMovie pic.twitter.com/4BlPoizI6M
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2020He's back... Warner Bros Pictures to *re-release* #Joker on 14 Feb 2020 in #India. #JokerMovie pic.twitter.com/4BlPoizI6M
— taran adarsh (@taran_adarsh) January 28, 2020
जोकर या चित्रपटाचे स्क्रिनिंग जेव्हा व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये पार पडले होते. तेव्हा चित्रपट पाहून प्रेक्षकांनी सलग ८ मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन दिली होती.जोकिन फोयनिक्स या अभिनेत्याने साकारलेला जोकर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.
जगभरातील प्रत्येक समिक्षकांनी जोकर पाहून आपल्या उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोकर चित्रपट हा असा चित्रपट आहे, की ज्यामुळे कलाकारांची कारकिर्द, भूमिका, व्यक्तीरेखा यांना कलाटणी मिळू शकते.व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलला मिळालेल्या प्रतिसादानंतर, विशेषतः ८ मिनिटांच्या स्टँडिंग ऑडिशननंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली होती. भारतात हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज झाला होता.