मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम यंदा 'मुंबई सागा' चित्रपटातून गँगस्टरच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी जॉनचा पहिला लुक शेअर केला आहे.
'मुबंई सागा'च्या या लुकमध्ये जॉनचा यापूर्वी कधीही न पाहिला गेला असेल, असा लुक पाहायला मिळतो. गळ्यात सोन्याची चैन, बोटात अंगठ्या आणि कपाळावर लाल टिळा, असा त्याचा हा लुक आहे.
-
One of my favourite moments from MUMBAI SAGA.
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) January 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
And of course Mr. Abraham like never before. 😊😊😊 pic.twitter.com/ooKz6wvt1l
">One of my favourite moments from MUMBAI SAGA.
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) January 13, 2020
And of course Mr. Abraham like never before. 😊😊😊 pic.twitter.com/ooKz6wvt1lOne of my favourite moments from MUMBAI SAGA.
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) January 13, 2020
And of course Mr. Abraham like never before. 😊😊😊 pic.twitter.com/ooKz6wvt1l
हेही वाचा -वरुण धवन बनला 'मिस्टर लेले', पहिलं पोस्टर प्रदर्शित
या चित्रपटाची कथा ८० - ९० च्या दशकातील आहे. यामध्ये बॉम्बेचा मुंबईपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण झाला. तसेच गिरणी कारखाने बंद होऊन त्याठिकाणी मॉल तयार झाले. त्यावेळची परिस्थीती कशी होती, हे दाखवण्यात येणार आहे.
जॉन अब्राहम यापूर्वी 'शूटआऊट अॅट वडाला' या चित्रपटातही गँगस्टरच्या भूमिकेत दिसला होता. संजय गुप्ता यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
'मुबंई सागा' चित्रपटात जॉनसोबत जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर हे देखील भूमिका साकारणार आहेत. तसेच, शरमन जोशी, समीर सोनी आणि पंकज त्रिपाठी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळतील.
हेही वाचा -सोनाक्षी सिन्हाचा अॅक्शन अवतार, शेअर केला थ्रोबॅक व्हिडिओ
रोहित रॉय आणि अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'काबिल', 'शूटआउट अॅट वडाला' आणि 'कांटे' यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १९ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.