मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी या दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. दोघेही लवकरच 'गँगस्टर'च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १९८०-९० च्या दशकातील चित्रपटाच्या गँगस्टर कथानकावर त्यांचा आगामी चित्रपट आधारित राहणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत.
'मुंबई सागा' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जॉन आणि इमरानसह जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार दिसणार आहेत.
![John Abraham and Emraan Hashmi in MumbaiSaga](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3554636_m3.jpg)
या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता हे करत आहेत. तर, भूषण कुमार, क्रिश्न कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
![John Abraham and Emraan Hashmi in MumbaiSaga](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3554636_m1.jpg)
'मुंबई सागा' हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. जुलै महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. संजय गुप्ता यांनी चित्रपटसृष्टीमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी १९९४ साली 'आतीश' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनीय पदार्पण केले होते.