मुंबई - बॉलिवूडचं क्यूट लव्हबर्ड म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या जोडीची ओळख आहे. रितेशचा आज ४१ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून खास रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रितेश - जेनेलियाची लव्हस्टोरी सर्वांना माहितीच आहे. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि नंतर हळूवार त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. मात्र, तब्बल ८ वर्षानंतर जेनेलियाने रितेशला लग्नासाठी होकार दिला. आता त्यांच्या लग्नालाही ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१२ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती.
हेही वाचा- हिंदीसह तेलुगु आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'
रितेश आणि जेनेलियाच्या जोडीची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यांच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव असतो. लग्नानंतर जेनेलिया फारशी चित्रपटांमध्ये झळकली नाही. मात्र, रितेशच्या पाठीशी ती खंबीर उभी असते.
रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने रितेश आणि आपल्या मुलांसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने एक प्रेमळ संदेशही लिहला आहे. 'नेहमीसाठी माझ्याकरता प्रिय असणारा.. मी तुला नेहमी एकच गोष्ट सांगेल आणि ज्यावेळी तू १०० वर्षांचा होशील तेव्हाही मी तुला हेच सांगेल की तू माझा आज, उद्या आणि येणारे सर्व दिवस आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा', असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा -पर्यटन नगरी खजुराहोमध्ये रंगणार सात दिवसीय 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'
जेनेलियाच्या या पोस्टवर आत्तापर्यंत २ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनीही रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रितेश यावर्षी 'हाऊसफूल ४' आणि 'मरजावां' चित्रपटात झळकला. या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. आता तो 'बागी ३'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तो टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा -पहिल्या आठवड्यात 'मर्दानी २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या कमाई