ETV Bharat / sitara

'कारगिल गर्ल'मधील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित - गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल

जान्हवीनेदेखील या चित्रपटातील दोन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चित्रपटातील पंकज त्रिपाठींचा लूकही तिने शेअर केलेल्या पोस्टरवर पाहायला मिळतो.

'कारगिल गर्ल'मधील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित
author img

By

Published : Aug 29, 2019, 11:27 AM IST

मुंबई - 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवीनं अनेक नवे सिनेमे साईन केले. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या 'रूही अफ्झा' आणि 'कारगिल गर्ल'सारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटातला तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' असे या पोस्टरवर नाव देण्यात आले आहे. तर, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही या पोस्टरवर पाहायला मिळते. १३ मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

जान्हवीनेदेखील या चित्रपटातील दोन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चित्रपटातील पंकज त्रिपाठींचा लूकही तिने शेअर केलेल्या पोस्टरवर पाहायला मिळतो. पंकज त्रिपाठी यामध्ये तिच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. 'मेरी बेटी की उडान कोई रोक नही सकता, अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

हा चित्रपट कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या पहिल्या लढवैय्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. जान्हवी यात गुंजन यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे.

या दोघांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.