मुंबई - सिनेदिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांनी कालच आपल्या घरातील नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्य़ाचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या वडिलांची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळत आहे, हे सांगितले आहे.
जान्हवीने बोनी कपूर यांची पोस्ट शेअर केली असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''घरी थांबणे हाच आमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. सर्वजण सुरक्षित रहा.''
अभिनेता कार्तिक आर्यन याने जान्हवीच्या या पोस्टवर कॉमेंट केली आहे.
काल बोनी कपूर यांनी निवेदनात म्हटले होते, ''मी, माझी मुले आणि इतर कर्मचारी ठीक आहोत. आमच्या कुणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही कोणीही घर सोडलेले नाही. आम्हाला केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे आम्ही आभारी आहोत.''
- View this post on Instagram
Staying at home is still the best solution we have. Stay safe everyone 🙏🏻
">
चरण साहू (23) हा नोकर बोनी कपूर यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरी राहतो. चरण शनिवारपासून आजारी होता. बोनी कपूरने त्याला कोरोना चाचणीसाठी पाठवले असता तो पॉझिटिव्ह निघाला.
चित्रपटांचा विचार करता जान्हवी कपूर आगामी 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल', 'तख्त' आणि 'दोस्ताना २' या चित्रपटातून झळकणार आहे.