मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर आणि जॅकी श्रॉफ यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होते. आता 'बागी ३' चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. या चित्रपटात खऱ्या आयुष्यातील ही बाप-लेकाची जोडी एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहे.
होय, जॅकी श्रॉफ हे रिल लाईफमध्येही टायगरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.
'बागी ३' चित्रपटात जॅकी हे पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. साजिद नाडियाडवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर'च्या यशासाठी वरुण - श्रद्धाची दिल्लीतील गुरुद्वारा बंगला साहिबला भेट
नाडियाडवाला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की 'प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून टायगर आणि जॅकी श्रॉफ यांना एकत्र पाहायचे होते. जेव्हापासून टायगरने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे तेव्हापासून जॅकीसोबत भूमिका साकारण्याची त्याची इच्छा होती'.
'बागी ३' चित्रपटाच्या कथानकाच्या गरजेनुसार आता जॅकी यांनी शूटिंग सुरू केले आहे. त्यामुळे आता पडद्यावर जॅकी आणि टायगर यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहायला मिळेल.
हेही वाचा -'दुर्गावती'च्या शूटिंगला सुरुवात, भूमीने शेअर केला फोटो
६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.