ETV Bharat / sitara

ईशान खट्टरसोबत जमणार अनन्याची जोडी, एकत्र साकारणार भूमिका - मीरा नायर

सध्या अनन्या कार्तिक आर्यनसोबत 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती ईशान खट्टरसोबत भूमिका साकारणार आहे.

ईशान खट्टरसोबत जमणार अनन्याची जोडी, एकत्र साकारणार भूमिका
author img

By

Published : Aug 26, 2019, 9:48 AM IST

मुंबई - 'धडक' फेम ईशान खट्टर लवकरच अनन्या पांडेसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. अनन्याने याचवर्षी 'स्टूडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून पदार्पण केलं आहे. तिच्या अभिनयाची कलाविश्वात प्रशंसाही होत आहे. त्यामुळेच आगामी चित्रपटांसाठी अनन्याला ऑफर्स देण्यात येत आहेत. आता ती ईशान खट्टर सोबतदेखील भूमिका साकारताना दिसणार आहे.

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची जोडी आगामी 'काली पीली' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचेही म्हटले जात आहे. अली अब्बास जफर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

सध्या अनन्या कार्तिक आर्यनसोबत 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर लगेच ती 'काली पीली' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होईल.

ईशान खट्टर देकील दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या 'अ सुटेबल बॉय'मध्ये काम करत आहे. 'धडक' चित्रपटानंतर तो पडद्यावर झळकला नाही. मात्र, आता तो अनन्यासोबत 'काली पीली'मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं रंजक ठरेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.