'खारी बिस्कीट' हा झी स्टुडिओज निर्मित सिनेमा येत्या 1 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमातून एका भावा बहिणीची गोड जोडी आपल्याला भेटणार आहे ती म्हणजे खारी आणि बिस्कीट यांची जोडी..खारी म्हणजेच वेदश्री खाडिलकर आणि बिस्कीट म्हणजेच आदर्श शिंदे हे दोघे एक मस्त सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत. संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा म्हणजे या दोघांच्या भावविश्वाची कहाणी आहे.
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या एवढ्या जवळची असते की, तिच्यासाठी काहीही करायची आपली तयारी असते. बिस्कीटाच्या आयुष्यात अशीच असते ती त्याची लाडकी बहीण खारी जिला डोळे नसल्याने ती हे जग पाहू शकत नाही..तिच्या आनंदासाठी हा भाऊ नक्की काय काय करतो ते या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या दोघांनी शूटिंग करताना एकमेकांसोबत प्रचंड मस्ती केलेलीच आहे. पण संजय दादा यांनाही काही कमी त्रास दिलेला नाही. आदर्श आणि त्यांची सिनेमातली मित्रमंडळी मिळून संजय जाधव यंची मस्त ऍक्टिंग करतात, तर वेदश्री सुध्दा चक्क सई बनून हिरोईनचे नखरे दाखवत त्यांना मस्त साथ देते. एकमेकांच्या साथीने मस्त हसत खेळत प्रसंगी संजय दादाचा ओरडा खाऊन, तर कधी आपल्या प्रेमळ हट्टासाठी त्याला त्याच डाएट सोडून चक्क वडापाव खायला लावेपर्यंत या सगळ्यांनी खूप धमाल केली आहे..
एकूणच या खारी आणि बिस्कीट यांचं एकमेकांसोबतच बॉंडिंग कस आहे आणि भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी नक्की काय काय गंमत सांगितली आहे ते जरा त्यांच्याकडूनच ऐकूयात..त्याच्याशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..