मुंबई - पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ती अँड ती' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात पत्नी आणि लहानपणीचं प्रेम असलेली मैत्रीण यांच्यात अडकलेल्या एका तरुणाची कथा मांडण्यात आली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्यांचाच मुलगा विराज कुलकर्णी याने या सिनेमाची कथा लिहिली आहे.
सिनेमाचं संपूर्ण शूटिंग इंग्लंडमध्ये झालं आहे. त्यामुळे तिकडची सुंदर लोकेशन्स या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने या तिघांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी.