ETV Bharat / sitara

'मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये बॉलिवूडकरांची मांदियाळी - अर्जुन कपूर

'मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल' ८ ते १५ ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात २२ पेक्षा जास्त भाषांमधील ६० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

'मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये बॉलिवूडकरांची मांदियाळी
author img

By

Published : Aug 9, 2019, 9:39 AM IST

नवी दिल्ली - 'मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात ८ ऑगस्टपासून झाली आहे. या महोत्सवाची सुरुवात भव्यदिव्य आणि पत्रकार परिषदेद्वारे झाली. या सोहळ्यात बॉलिवूडचे बरेच कलाकार सहभागी झाले आहेत. तर, किंग खान शाहरुख यावेळी या फेस्टिव्हलचा प्रमुख पाहुणा आहे.

शाहरुख खानसोबतच दिग्दर्शक करण जोहर, तब्बु, अर्जुन कपूर हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी शाहरुखने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

तो म्हणाला, 'येथे मी 'चक दे इंडिया'च्या शूटिंगसाठी आलो होतो. त्यामुळे हे शहर माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. या शहराशी जुळलेल्या बऱ्याच आठवणी आहेत'. आपल्या मजेशीर अंदाजात तो पुढे म्हणाला, की 'खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा मी एक यशस्वी सुपरस्टार होतो. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाले होते. आता माझे जसे पाहिजे तसे चित्रपट हिट होत नाहीयेत. मात्र, माझ्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो'.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.