ETV Bharat / sitara

''मी भारताचा मोठा चाहता असून ताजमहाल पाहायची इच्छा आहे'' - टॉम हॉलंड - स्पारडरमॅन फेम टॉम हॉलंड

हॉलिवूड स्टार टॉम हॉलंड याचा 'अनचार्टेड' हा चित्रपट भारतात 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करताना त्याने आपले भारताविषयीचे प्रेम बोलून दाखवले.

टॉम हॉलंड
टॉम हॉलंड
author img

By

Published : Feb 15, 2022, 7:26 PM IST

नवी दिल्ली - हॉलिवूड स्टार टॉम हॉलंड याचा 'अनचार्टेड' हा चित्रपट भारतात प्रदर्शनासाठी तयार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करताना त्याने आपले भारताविषयीचे प्रेम बोलून दाखवले. त्याला ताजमहाल पाहायची इच्छा असून भारतात फिरायला आणि इथे शुटिंग करण्यासाठीही त्याला आवडेल, असे तो म्हणाला.

आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवताना तो म्हणाला, "मी माझा नवीन चित्रपट घेऊन येत आहे आणि मला आशा आहे की भारतीय प्रेक्षकांनाही तो आवडेल. मला माझ्या भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी भारतात यायला आवडेल किंवा कदाचित एखाद्या दिवशी तिथे चित्रपटाचे शूटिंगही करायला आवडेल. मला भारताचा प्रत्येक भाग पाहायला आवडेल. भारतातील ताजमहालचाही यात समावेश आहे. तिथली प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे. मला भारतभर फिरण्याची खूप इच्छा आहे."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अनचार्टेड' चित्रपट 18 फेब्रुवारीला इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी भारतीय प्रेक्षकांना हॉलंडचा 'स्पायडर-मॅन: नो वे होम' मध्ये खूप आवडला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला होता.

हेही वाचा - कमल अमरोही आणि मीना कुमारी यांची प्रेमकथा मालिकेत फुलताना दिसणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.