ETV Bharat / sitara

माझ्याकडे सेलफोन किंवा कंप्यूटर नाही - ऑस्कर विजेता क्रिस्टोफर वॉकेन - ऑस्कर विजेता अभिनेता क्रिस्तोफर वॉकन

अभिनेता क्रिस्तोफर वॉकन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढारलेला नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याच्याकडे सेलफोन किंवा कंप्यूटरदेखील नाही. एखाद्या सिनेमासाठी जर मला सेल फोन वापरावा लागला तर तो दुसऱ्याच्या मदतीने डायल करावा लागेल असे त्यांने सांगितलंय.

Christopher Walken
क्रिस्टोफर वॉकेन
author img

By

Published : Dec 17, 2020, 12:58 PM IST

लॉस एंजेलिस - ऑस्कर विजेता अभिनेता क्रिस्तोफर वॉकन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढारलेला नाही. त्याने सांगितले की त्याच्याकडे सेल फोन अथवा कंप्यूटरदेखील नाही. झूम कॉलद्वारे 'द लेट शो' वर मुलाखतीच्या वेळी वॉकेनने होस्टला सांगितले, "माझ्याकडे सेलफोन किंवा संगणक नसल्यामुळे कोणीला तरी येऊन हे सेट करून घ्यावे लागेले."

ईडब्ल्यू.कॉमच्या एका वृत्तानुसार तंत्रज्ञानापासून दूर राहण्यामागे काही नैतिक कारण आहे का? असे होस्टने विचारले. यावर उत्तर देताना क्रिस्तोफर वॉकन म्हणाला, "नाही, नाही, मला आता खूप उशीर झाला आहे. मला वाटते की हे तंत्रज्ञान आले तेव्हा मी योग्य वयात होतो, परंतु मी त्यात भाग घेतला नाही. हे अजब आहे की १० वर्षाचा मुलगाही माझ्यापेक्षा उत्तम आहे."

हेही वाचा -'मावडी कडेपठार', सुपरस्टार रजनीकांत यांच्या पूर्वजांचं मूळ गाव

अभिनेता क्रिस्तोफर वॉकन पुढे म्हणाला की सेलफोन घड्याळांसारखे आहेत. त्याने कधीही ईमेल किंवा टेक्स्ट मजकूर पाठविला नाही आणि ट्विटरवरही आलो नसल्याचे त्याने म्हटले आहे. वॉकेन म्हणाला, "एखाद्या चित्रपटासाठी त्यांनी मला जर सेल फोन दिला आणि वापरायला सांगितले तर तो माझ्यासाठी कुणीतरी डायल करावा लागेल.''

हेही वाचा -दीपिका अभिनीत 'द इंटर्न'च्या रिमेकसाठी ऋषी कपूर यांच्या जागी अभिनेत्याचा शोध जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.