ETV Bharat / sitara

हुमा कुरेशीच्या 'लीला' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

author img

By

Published : May 17, 2019, 9:08 PM IST

'लीला' या वेबसीरिजमध्ये भयाण जगाचे वास्तव दाखवण्यात येणार आहे. ६ भागांमध्ये ही वेबसीरिज स्ट्रीम केली जाणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रयाग अकबरच्या 'लीला' पुस्तकावर आधारित आहे.

हुमा कुरेशीच्या 'लीला' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या पहिल्या-वहिल्या वेबसीरिजसाठी सज्ज झाली आहे. 'लीला' या वेबसीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज पाहता येणार आहे. थ्रिलरने परिपूर्ण असलेल्या या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Huma Qureshi Leila webseries trailer release

हुमा कुरेशीचा दमदार अभिनय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. ती यामध्ये 'शालिनी' नावाचे पात्र साकारत आहे. 'शालिनी'च्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटांना ती कशाप्रकारे सामोरे जाते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

या सीरिजचे दिग्दर्शन दीपा मेहता, शंकर रमन आणि पवन कुमार यांनी केले आहे. या सीरिजच्या माध्यमातून हुमा डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे.

Intro:Body:

Ent 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.