ETV Bharat / sitara

VIDEO: 'फॅट टू फिट', 'सुपर ३०' नंतर असा तयार झाला 'वॉर'चा 'कबिर' - war box office collection

आपल्या भूमिकेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी कलाकार आपल्या अभिनयासोबतच आपल्या लूक्सकडे लक्ष देत असतात. 'वॉर' चित्रपटातही टायगरच्या तोडीस तोड दिसण्यासाठी हृतिकलाही बरीच मेहनत घ्यावी लागली.

VIDEO: 'फॅट टू फिट', 'सुपर ३०' नंतर असा तयार झाला 'वॉर'चा 'कबिर'
author img

By

Published : Oct 11, 2019, 1:32 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या ७ दिवसात या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात दोघांच्याही अॅक्शनप्रमाणेच त्यांच्या फिटनेसचीही क्रेझ पाहायला मिळाली. मात्र, ही फिटनेस साकारण्यासाठी पडद्यामागे त्यांनी साकारलेली मेहनत पाहुन तुम्हीही थक्क व्हाल.

'सुपर ३०' नंतर असा तयार झाला 'वॉर'चा 'कबिर'

आपल्या भूमिकेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी कलाकार आपल्या अभिनयासोबतच आपल्या लूक्सकडे लक्ष देत असतात. 'वॉर' चित्रपटातही टायगरच्या तोडीस तोड दिसण्यासाठी हृतिकलाही बरीच मेहनत घ्यावी लागली. खरंतर या चित्रपटापूर्वीच त्याचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो थोडा स्थुल दिसला होता. आनंद कुमारांच्या लूकसाठी त्याला वजनही घटवावे लागले होते. मात्र, 'वॉर' चित्रपटात त्याचा लूक एकदम फिट पाहायला मिळाला.

हेही वाचा -बॉलिवूडचे सर्व विक्रम मागे टाकत 'वॉर' सिनेमाने रचला नवा इतिहास

हा लूक साकारण्यासाठी त्याला नेमके काय काय करावे लागले, त्याचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या स्थुल बॉडीला फिट स्वरुपात आणण्यासाठी त्याने घेतलेली ही मेहनत पाहुन नेटकरीही अचंबित झाले आहेत.

'वॉर' चित्रपटात हृतिकने 'कबिर' ही भूमिका साकारली आहे. तर, त्याच्याविरुद्ध टायगर श्रॉफचीही दमदार भूमिका पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर विक्रम रचण्यास सुरुवात केली होती. हा चित्रपट ३०० कोटीचा आकडाही पार करेल, असा विश्वास चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'वॉर' पाहायला जाताय, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Intro:Body:

सोलापूर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपत देताना तसेच जवळच्या 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.