मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट झाली आहेत. यापैकी 'धिमे धिमे' हे गाणे तरूणाईत खूपच लोकप्रिय झाले आहे. बॉलिवूडचा हॅन्डसम हंक हृतिक रोशनवरही या गाण्याची भूरळ पाहायला मिळाली. एका कार्यक्रमात त्याने कार्तिकसोबत या गाण्यावर डान्स केला.
सोशल मीडियावर कार्तिक आणि हृतिकचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हृतिकचा धमाल डान्स पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'धिमे धिमे' या गाण्यावर आत्तापर्यंत बऱ्याच कलाकारांनी डान्स केला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या गाण्यावर डान्स करण्याचं आव्हान चित्रपटाच्या टीमने दिले होते. यामध्ये सहभाग घेऊन बऱ्याच कलाकारांनी हे आव्हान पूर्ण केले होते. हृतिक रोशननेही या गाण्याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.