मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दमदार ट्रेलर, थरारक अॅक्शन आणि दोन सुपरहिट अॅक्शन हिरो एकत्र येणार असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली आहेत. तर, टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'जय जय शिवशंकर' हे गाणं सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.
'वॉर' चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र, टायगर आणि हृतिक दोघेही एकत्र या चित्रपटाचं प्रमोशन करू शकणार नाही. यामागे निर्मात्यांची एक अट आहे. ती म्हणजे चित्रपटात ज्याप्रमाणे हृतिक आणि टायगर एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. हाच भाग प्रमोशन दरम्यानही टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रमोशन करणार आहेत.
हेही वाचा -टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित
हृतिक हा टायरगचा ऑयडॉल आहे. पहिल्यांदाच टायगरने हृतिकसोबत स्क्रिन शेअर केली आहे. मात्र, 'वॉर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघेही एकत्र नसणार आहेत. प्रमोशनमध्ये जरी ते एकत्र दिसले नाही, तरीही चित्रपटामध्ये त्यांची एकत्र अॅक्शन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'वॉर'चं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या २ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'वॉर' चित्रपटात टायगरने एकाच शॉटमध्ये साकारला अडीच मिनिटांचा अॅक्शन सिन, दिग्दर्शकाचा खुलासा