मुंबई - अलीकडच्या काळात फिल्ममेकर्सचा ओढा ऐतिहासिक चित्रपटांकडे आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. मराठीतील ‘फतेहशिकस्त’, हिंदीतील ‘तान्हाजी’ अशा अनेक हिंदी-मराठी ऐतिहासिक चित्रपटांना व्यावसायिक यश मिळाल्यामुळे अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत असावेत. प्रेक्षकांना जे आवडते ते देण्याचा चित्रपट निर्मात्यांचा कल असतो. आता डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्रग्रंथावर आधारित एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे ज्याचे नाव आहे ‘ताराराणी’. महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' यांच्या कर्तृत्वावर हा सिनेमा प्रकाश टाकेल.
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी लीलया पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांची शूर आणि कर्तबगार सून महाराणी ताराबाई, जिच्या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही, असे उद्गार ॲरिझोना विद्यापीठातील डॉ. रिचर्ड ईटन या इतिहासकाराने काढले आहेत. खाफीखानासारख्या औरंगजेबाच्या चरित्रकारानेही तिचा गुणगौरव केला आहे. औरंगजेबासारख्या क्रूर,बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना 'छत्रपती ताराराणी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्रग्रंथावर आधारित ऐतिहासिक सिनेमा ‘ताराराणी’! - Sonali Kulkarni in the role of Tararani
डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्रग्रंथावर आधारित एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे ज्याचे नाव आहे ‘ताराराणी’. महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी 'छत्रपती ताराराणी' यांच्या कर्तृत्वावर हा सिनेमा प्रकाश टाकेल.