मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. अत्यंत ह्रदयस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एका बाजूला आनंद देणारा तर दुसऱ्या बाजूला डोळ्यात आश्रू आणणारा आहे. डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या ओटीटी प्लेटफॉर्मचे सबस्क्रीबशन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे.
-
THE WAIT IS OVER... What a lovely, heart-warming trailer of #DilBechara... Wins you over completely... #SushantSinghRajput ❤❤❤... #DilBecharaTrailer: https://t.co/XUZOqW1rDI
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">THE WAIT IS OVER... What a lovely, heart-warming trailer of #DilBechara... Wins you over completely... #SushantSinghRajput ❤❤❤... #DilBecharaTrailer: https://t.co/XUZOqW1rDI
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2020THE WAIT IS OVER... What a lovely, heart-warming trailer of #DilBechara... Wins you over completely... #SushantSinghRajput ❤❤❤... #DilBecharaTrailer: https://t.co/XUZOqW1rDI
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2020
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून या ट्रेलरची माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा - गर्लफ्रेंड बुरा मान जायेगी : सुशांतचा जुना व्हिडिओ व्हायरल
सुशांतच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, मित्र मैत्रिणी आणि त्याच्या फॅन्सना देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या दिल बेचारा चित्रपटातून त्यांना आपल्या लाडक्या कलाकाराची अखेरची कलाकृती डोळे भरून पाहता येऊ शकेल. 'दिल बेचारा' हा चित्रपट २४ जुलै रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या गाजलेल्या 'द फ़ॉल्ट इन अवर स्टार्स' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केले आहे.