परेश रावल यांनी १९८५ साली 'अर्जुन' चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून पदार्पण केले. १९८६ मध्ये आलेल्या नाम चित्रपटामुळे त्यांना लौकिक मिळाला आणि अभिनेता म्हणून नावही मिळाले. ८० ते ९० च्या दशकात परेश रावल यांची १०० हून अधिक चित्रपटातून भूमिका साकारल्या. एक क्रूर खलनायक साकारताना त्यांची एक प्रकारे दहशत निर्माण झाली होती. रुप की राणी चोरों का राजा, किंग अंकल, राम लखन, दौड, बाजी अशा असंख्य सिनेमातून रावल यांनी खलनायक साकारला. अंदाज अपना अपना या कल्ट कॉमेडीमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.
![HBD Paresh Rawal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11949267_paresh_650x488_41464593104-1.png)
'हेरा फेरी'तील बाबुराव गणपतराव आपटेची कमाल
२००० मध्ये आलेल्या हेरा फेरी चित्रपटाने रावल यांनी प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकली. राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) हे दोन भाडेकरु आणि घरमालक बाबूराव आपटे (परेश रावल) यांची पडद्यावरची केमेस्ट्री कमालीची होती. त्यांनी अंधुक दिसणारा, बढाईखोर आणि दयाळू मराठी जमीनदार बाबुराव गणपतराव आपटे ज्या पध्दतीने साकारला त्याला तोड नव्हती. या चित्रपटासाठी त्यांना अभिनयासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार मिळाला. त्यानंतर २००६ मध्ये आलेल्या हेरा फेरीच्या सीक्वेललाही तितकीच लोकप्रियता मिळाली.
![HBD Paresh Rawal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11949267_hera-pheri.jpg)
परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीत जितके लोकप्रिय आहेत तितकेच दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आहेत. आजवर त्यांनी दक्षिणेत काम केलेल्या चित्रपटांच्या यादीवर लक्ष टाकले तर ती यादी खूप मोठी आहे.
'ओ माय गॉड'मुळे लोकप्रियतेच्या शीखरावर
२०१२ मध्ये आलेल्या 'ओ माय गॉड' (OMG) चित्रपटाने हेरा फेरीनंतर पुन्हा धुमाकुळ घातला. या चित्रपटातील कांजिलाल मेहता ही त्यांनी साकारलेली व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. २०१८ मध्ये राजकुमार हिरानी यांच्या ‘संजू’ (संजय दत्तचा बायोपिक) चित्रपटात सुनील दत्त (संजय दत्तचे वडील) ही व्यक्तीरेखा साकारली होती.
![HBD Paresh Rawal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11949267_on_the_sets_of_omg.jpg)
राजकारणात प्रवेश
परेश रावल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मानले जातात. २०१४ मध्ये ते गुराजमधून लोकसभेवर निवडून गेले होते. २०२० मध्ये त्यांची राष्ट्रपतींनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. परेश रावल यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. परेश राव यांना वाढदिवसानिमित्य ईटीव्ही परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!
![HBD Paresh Rawal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11949267_800px-thumbnail.jpg)
हेही वाचा - सावनी रवींद्रच्या घरी, “कुणी तरी येणार, येणार गं”!