ETV Bharat / sitara

HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!! - अशोक - लक्ष्या जोडीचा धुमाकुळ

अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीत गेली ५० वर्षे ते कार्यरत आहेत. रोमँटिक नायकापासून संवेदनशील भोळ्या व्यक्तीरेखा आणि खलनायकापासून विनोदी व्यक्तीरेखा असा बहुढंगी अभिनय प्रवास त्यांनी केलाय. मराठी बरोबरच त्यांनी हिंदी सिनेमातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा अभिनय प्रवास.

HBD Ashok Saraf
HBD अशोक सराफ
author img

By

Published : Jun 4, 2021, 4:26 PM IST

Updated : Jun 4, 2021, 6:01 PM IST

मुंबई - आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. मराठी चित्रपटसृष्टीत गेली ५० वर्षे ते कार्यरत आहेत. रोमँटिक नायकापासून संवेदनशील भोळ्या व्यक्तीरेखा आणि खलनायकापासून विनोदी व्यक्तीरेखा असा बहुढंगी अभिनय प्रवास त्यांनी केलाय. आज या हरहुन्नरी अभिनेत्याबद्दल काही फारशा माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

बँकेत १० वर्षे नोकरी करीत होते अशोक सराफ

अशोक सराफ यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांगली प्रतिष्ठीत नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांना नोकरी मिळाली. पण अशोक यांचा संपूर्ण कल हा अभिनयाकडे होता. नोकरी करीत असताना नाटकातून त्यांनी काम सुरू ठेवले होते. तब्बल १० वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी अभिनयासाठीच पूर्ण वेळ द्यायचा हा निर्णय केला आणि मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला एक जबरदस्त प्रतिभावंत कलाकार गवसला.

रंगभूमीवरचा विदुषक

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वि.स. खांडेकरांच्या 'ययाती आणि देवयानी'या कादंबरीवर आधारित नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली. याच भूमिकेमुळे त्यांच्या करिअरची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यानंतर १९७१ मध्ये त्यांना 'दोन्ही घरचा पाहूणा' चित्रपटात भूमिका मिळाली.

अशोक सराफचे अशोकमामा कसे झाले?

अशोक सराफ यांनी फिल्म इंडस्ट्रीतील लोक अशोकमामा या नावानेच ओलखतात. त्यांना हे नाव कसे मिळाले याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ''कोल्हापूरातील लोक प्रेमाने मामा अशी हाक मारतात. एका सिनेमाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबोरबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ... पण तू त्यांना अशोकमामा म्हणायचे आणि तेथूनच मला अशोकमामा म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारु लागले." अशी आपल्या मामा होण्याची गोष्टी असोक यांनी सांगितली होती.

पांडू हवालदार सिनेमाने अशोक सराफांना लोकप्रियता

१९७५ मध्ये आलेल्या दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'ने अशोक सराफ यांना ओळख मिळवून दिली. हा विनोदी सिनेमा प्रचंड गाजला. दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची ऑनस्क्रिन केमेस्टी वेड लावणारी होती. दादा 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. पण दुर्दैवाने दोघांची जोडी फार काळ रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली नाही. पण या सिनेमानंतर ते खूप लोकप्रिय झाले.

अशोक - लक्ष्या जोडीचा धुमाकुळ

सिनेमातील जशा हिरो हिरोईनच्या जोड्या बऱ्याच गाजल्या तश्या काही विनोदी अभिनेत्यांच्या जोड्यानी देखील प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची. ८० -९० च्या दशकात या जोडीने मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यांसारख्या सिनेमातून धमाल उडवून दिली. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.

राठी बरोबरच त्यांनी हिंदी सिनेमातही आपली स्वतंत्र ओळख निमाण केली आहे. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं. 1' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.

अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा सुखाचा संसार सुरू आहे. त्यांचा मुलगा अनिकेत हा सध्या अमेरिकेत नोकरी करतो. त्यानेही अभिनयाची आवड जोपासली आहे. अशोकमामांच्या वाढदिवसानिमित्य त्यांना भरपूर शुभेच्छा !!

हेही वाचा - ड्रीम गर्ल' अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभचा कोरोनामुळे मृत्यू

Last Updated : Jun 4, 2021, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.