ETV Bharat / sitara

'मन्नत अनसीन', पाहा असा भव्यदिव्य आहे गौरी आणि शाहरुखचा बंगला - जॅकलिन फर्नांडिस

गौरी एक सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. तिची कल्पक दृष्टी आणि कलात्मकतेने तिने 'मन्नत'ला सजवले आहे. 'घरातील सुंदर व्यक्तींमुळे घर सुंदर बनते', असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

असा भव्यदिव्य आहे गौरी आणि शाहरुखचा बंगला
author img

By

Published : Aug 8, 2019, 10:46 AM IST

मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानची ओळख आहे. दोघेही एक 'कपल गोल' मानले जातात. आपल्या आवडीच्या कलाकारांची लाईफस्टाईल, त्यांच्या घराचे फोटो जर चाहत्यांना पाहायला मिळाले तर ही त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच म्हणावी लागले. गौरीने त्यांच्या आलिशान 'मन्नत' बंगल्यामध्ये प्रसिद्ध मॅगझीन 'वोग'साठी फोटोशूट केले आहेत. यामधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या आलिशान 'मन्नत' बंगल्यासमोर वाट पाहत असतात. त्याच्या याच 'मन्नत'चे यापूर्वी कधीही समोर न आलेले फोटो गौरीने शेअर केले आहेत.

गौरी एक सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. तिची कल्पक दृष्टी आणि कलात्मकतेने तिने 'मन्नत'ला सजवले आहे. 'घरातील सुंदर व्यक्तींमुळे घर सुंदर बनते', असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

गौरीने बॉलिवूडच्याही बऱ्याच कलाकारांची घरे डिझाईन केली आहेत. करण जोहरच्या मुलांची रूम तिनेच सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही घरांचे इंटिरियर तिने केले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.