ETV Bharat / sitara

'गुडन्यूज' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

पहिल्याच दिवशी 'गुडन्यूज' चित्रपटाने २२.५९ कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खानचा 'दबंग ३' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच शर्यत रंगली होती.

Good Newwz film crossed 100 corores at box office
'गुडन्यूज' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
author img

By

Published : Jan 2, 2020, 2:40 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा आडवाणी आणि दलजीत दोसांझ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडन्यूज' चित्रपटाने १ जानेवारीला १०० कोटींचा आकडा पार केला. अक्षय कुमारचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चौथा चित्रपट होता. सलग चौथ्या चित्रपटानेही १०० कोटींचा आकडा पार करत त्याच्यासाठी नववर्षाची चांगली सुरुवात करून दिली आहे.

पहिल्याच दिवशी 'गुडन्यूज' चित्रपटाने २२.५९ कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खानचा 'दबंग ३' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच शर्यत रंगली होती.

  • #GoodNewwz is 💯 Not Out... Hits the ball out of the park on Day 6... Ends 2019 with #GoodNewwz... Begins 2020 with #GoodNewwz... Fri 17.56 cr, Sat 21.78 cr, Sun 25.65 cr, Mon 13.41 cr, Tue 16.20 cr, Wed 22.50 cr. Total: ₹ 117.10 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -नववर्षात फरहान अख्तरची नवी इनिंग, पाहा फोटो

'गुडन्यूज'चे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट होता. अक्षयने आत्तापर्यंत तब्बल २१ पदार्पणीय दिग्दर्शकासोबत काम केले आहे.

या चित्रपटात डॉक्टरांच्या गोंधळामुळे दोन जोड्यांमध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात. त्यांना ते कशाप्रकारे सामोरे जातात, याची कथा मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

  • #Simmba - the last release of 2018 - crossed ₹ 💯 cr mark on 1 Jan [2019].
    #GoodNewwz - the last release of 2019 - will also cross ₹ 💯 cr mark on 1 Jan [2020].
    A wonderful coincidence, isn't it?

    — taran adarsh (@taran_adarsh) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षयचे मागच्या वर्षी 'केसरी', 'मिशन मंगल' आणि 'हाऊसफुल ४' या तिन्ही चित्रपटांनी १०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती. यापाठोपाठ 'गुडन्यूज'नेही १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

हेही वाचा -सुवर्णमंदिराला भेट देऊन सोनालीने केली नव्या वर्षाची सुरुवात

यावर्षीदेखील त्याचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये 'सूर्यवंशी', 'बच्चन पांडे', 'लक्ष्मी बाँब' आणि 'पृथ्वीराज' या चित्रपटांचा समावेश आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच आता अक्षयसाठी हे वर्ष देखील खास ठरेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.