मुंबई - बॉलिवूडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओचे मालकी हक्क आता गोदरेज कंपनीने घेतले आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये दिमाखात उभा असलेला आर. के. स्टुडिओ लवकरच पाडण्यात येणार आहे. आर.के स्टूडिओचे मालकी हक्क आता गोदरजे कंपनीला देण्यात आले आहेत. हा स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणादेखील कंपनीने केली आहे. हा स्टुडिओ पाडून येथे अलिशान फ्लॅट्स उभारले जाणार आहेत. त्यामुळे आर. के. स्टुडिओ हा इतिहासजमा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटूंबियांची गोदरेज कंपनीबरोबर स्टुडिओच्या जागेविषयी चर्चा सुरू होती. मात्र, स्टुडिओच्या विक्रीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या स्टुडिओच्या जागेवर आलिशान फ्लॅट्सची उभारणी करण्यात येणार आहे.
आर. के. स्टुडिओतून मिळणार उत्पन्न आणि खर्च हा परवडणारा नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय सिनेृष्टीतील बरेचसे चित्रपट या स्टुडिओमध्ये तयार करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटांचा साक्षीदार असलेला हा स्टुडिओ आता पाडण्यात येणार आहे.