ETV Bharat / sitara

'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' मध्ये रंगणार 'या' २ अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी

author img

By

Published : Dec 23, 2019, 3:30 PM IST

गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे हे दोन्ही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या 'इन्स्ट्टियूट ऑफ पावटॉलॉजी'मध्ये मांडण्यात आला आहे.

Girish Kulkarni and Sayaji Shinde will play together in institute of pavtalogy
'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' मध्ये रंगणार 'या' २ अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र आले आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी', या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यामुळे दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे.

'फटमार फिल्म्स एलएलपी', या निर्मिती संस्थेकडून 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'ची निर्मिती करण्यात येत आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.

Girish Kulkarni and Sayaji Shinde will play together in institute of pavtalogy
सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी

हेही वाचा -'अ सुटेबल बॉय'च्या अभिनेत्रीला अटक, मीरा नायरने केली सोडवण्याची मागणी

अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे हे दोन्ही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या 'इन्स्ट्टियूट ऑफ पावटॉलॉजी'मध्ये मांडण्यात आला आहे.

'सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं अाहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीतील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच.. पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल, असं सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा -खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : अभिनेता राजेंद्र गुप्तांची महोत्सवाला हजेरी

Intro:राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र आले आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटात या योग जुळून आला असून, त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे.

फटमार फिल्म्स एलएलपी या निर्मिती संस्थेकडून इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती करण्यात येत आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. त्यात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांचाही समावेश आहे. हे दोन्ही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अातापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या इन्स्ट्टियूट ऑफ पावटॉलॉजीमध्ये मांडण्य़ात आला आहे.

'सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं अाहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीतील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच.. पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल, असं सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी सांगितलं.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.