ETV Bharat / sitara

गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर झळकणार 'रावरंभा' चित्रपटात - nEW MARATHI MOVIE

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर 'रावरंभा' या आगामी ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. हा चित्रपट सातारा जिल्ह्यात चित्रित होणार आहे.

RAORAMBHA MOVIE
'रावरंभा' ऐतिहासिक चित्रपट
author img

By

Published : Nov 11, 2021, 8:05 PM IST

मुंबई - सध्या ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला "रावरंभा" हा चित्रपट येत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच "रावरंभा" या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. हा चित्रपट सातारा जिल्ह्यात चित्रित होणार आहे.

RAORAMBHA MOVIE
गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर झळकणार 'रावरंभा' चित्रपटात
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर रावरंभा या आगामी ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. अभिनेता ओम भूतकर ‘राव’ ही भूमिका साकारत असून ‘रंभा’ ची भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागल साकारणार आहे. तर अभिनेते गिरीश कुलकर्णी कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.

अशोक जगदाळे करणार दिग्दर्शन
गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र रावरंभा हा या दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामुळे या दोन मातब्बर अभिनेत्यांना ऐतिहासिक चित्रपटात एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे "रावरंभा - या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे.
हेही वाचा - ‘ती परत आलीये’ मालिकेत हणम्या सापडतो मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.