ETV Bharat / sitara

गायत्री दातारची सामाजिक बांधिलकी, गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी मदत

गायत्री एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचावं यासाठी मदत करत आहे. आपल्याकडून या समाजकार्यात मदत होत असल्यानं खूप समाधानी असल्याचं गायत्रीनं म्हटलं आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, हे सांगायलासुद्धा ती विसरली नाही.

गायत्री दातारची सामाजिक बांधिलकी
गायत्री दातारची सामाजिक बांधिलकी
author img

By

Published : May 6, 2020, 11:58 AM IST

Updated : May 6, 2020, 12:17 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांना सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. सध्या 'युवा डान्सिंग क्वीन'चे सूत्रसंचालन करणारी गायत्री दातार सामाजिक कार्यात हातभार लावत आहे. सध्या ती एका सामाजिक संस्थेच्या मदतीने गोरगरिबांची आणि गरजूंची मदत करत आहे.

पुणे महापालिकेच्या सहकार्याने ही सामाजिक संस्था बेघर आणि गरजू व्यक्तींना अन्न पुरवण्याचे काम करते. गायत्री या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचावं यासाठी मदत करत आहे. आपल्याकडून या समाजकार्यात मदत होत असल्यानं खूप समाधानी असल्याचं गायत्रीनं म्हटलं आहे.

या समाजकार्यविषयी गायत्रीनं सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीची गरज आहे. सध्या शूटिंग बंद असल्यामुळे माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य वापर करायचा असं मी ठरवलं. एका सामाजिक संस्थेला मदतकार्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचं मला एका मित्राकडून समजलं. अशी संधी मिळत असल्यामुळे, त्यावर फार काळ विचार करण्यात अर्थ नव्हता. मी मदत करण्याचा निर्णय घेतला. अन्नाचं पॅकिंग आणि वाटप या दोन्ही गोष्टींसाठी मदत करायला मी सुरुवात केली.

गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी गायत्री दातारची मदत

गायत्री म्हणाली, या कामांची लाज बाळगावी असं मला अजिबात वाटत नाही. बिकट स्थितीत या कामामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळते. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, हे सांगायलासुद्धा गायत्री विसरली नाही. मानसिक आरोग्य हीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनच्या काळात आपाले छंद जोपासून किंवा आवडते चित्रपट पाहून, संगीत ऐकून सर्वांनी आनंदी राहावं, असा सल्ला गायत्रीने दिला आहे.

Last Updated : May 6, 2020, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.