लॉस एंजेलिसः अभिनेत्री गाल गॅडोट 'वंडर वूमन 3' चित्रपटातून पुन्हा परतली आहे. वंडर वुमन १९८४ हा २०२० चा हॉलिवूड चित्रपट आहे. डी. सी. कॉमिक्सच्या वंडर वुमन या व्यक्तिरेखेवर आधारित याची कथा आहे. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन या चित्रपटाचा पुढील भाग आहे. गाल गॅडोट ने या चित्रपटात डायना प्रिन्स या 'वंडर वूमन'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅट्टी जेनकिन्स यांनी केले आहे.
"वंडर वूमन 3" हा चित्रपट २०१७ ला रिलीज झालेल्या "वंडर वूमन" ने सुरू झालेल्या सुपरहीरो ट्रायलॉजीचा समारोप करेल. वॉर्नर ब्रदर्स यांनी डीसी कॉमिक्स फ्रँचायझीमध्ये तिसर्या चित्रपटाचे वेगवान ट्रॅक प्रॉडक्शन केले आहे.
हेही वाचा - ट्विटरवर 'बिग बीं'नी दाखवली त्यांच्या तीन पिढ्यांची झलक
‘वंडर वूमन १९८४ ’ या मालिकेचा दुसरा चित्रपट २५ डिसेंबर रोजी ओटीटीशिवाय भारतासह जगातील अनेक देशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा - रजनीकांत यांचे पत्नी लता यांनी आरती करुन केले स्वागत, फोटो व्हायरल