ETV Bharat / sitara

भाईजानला मागे टाकत विराट कोहली बनला सर्वाधिक लोकप्रिय, फोर्ब्सच्या यादीत पटकावले पहिले स्थान - विराट कोहली बनला सर्वात महागडा स्टार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान हे भारतातले सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी अव्वल स्थानावर आहेत. मात्र, विराट कोहलीने या दोघांनाही लोकप्रियतेमध्ये मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

Forbes India 2019
भाईजानला मागे टाकत विराट कोहली बनला सर्वात महागडा स्टार, फोर्ब्सच्या यादीत पटकावले पहिले स्थान
author img

By

Published : Dec 19, 2019, 9:40 PM IST

मुंबई - जगप्रसिद्ध अमेरिकन मॅगझिन फोर्ब्सची यंदाची यादी प्रकाशित झाली आहे. यामध्ये १०० प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सलमान खानला लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. विराटची यावर्षीची कमाई २५२.७२ कोटी इतकी आहे. मात्र, त्याच्यापेक्षा जास्त कमाई असणाऱ्या अक्षय कुमार आणि सलमान खान या बॉलिवूड स्टार्सनाही त्याने पिछाडीवर सोडले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान हे भारतातले सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी अव्वल स्थानावर आहेत. मात्र, विराट कोहलीने या दोघांनाही मागे टाकत लोकप्रियतेमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान हे भारतातले सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी अव्वल स्थानावर आहेत.

हेही वाचा -प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं

१ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत आपल्या व्यक्तीमत्वाने प्रभावित करणाऱ्या व्यक्ती तसेच, सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या कलाकारांना फोर्ब्सच्या १०० सेलिब्रिटींमध्ये स्थान मिळते. अक्षय कुमारची यंदाची कमाई २९३.२५ कोटी आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत त्याच्या कमाईत तब्बल ५८.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, अक्षयला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. तर, सलमान खानची यंदाची कमाई २२९.२५ कोटी इतकी आहे. त्याला तिसरे स्थान मिळाले आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची कमाई २३९.२५ कोटी आणि १३५.९३ कोटी इतकी आहे. किंग खान शाहरुख हा सहाव्या स्थानावर तर, रणवीर सिंग हा सातव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा -'जो सपने देखते है वो पंगा लेते है', 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या नावाचा समावेश आहे. आलिया भट्टची कमाई ५९.२१ कोटी आहे. तिला आठवे स्थान मिळाले आहे. तर, दीपिका पदुकोणची कमाई ही ४८ कोटी आहे. ती दहाव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरची कमाई ७६.९६ कोटी आहे. त्याला ९ वे स्थान मिळाले आहे.

टॉप १०० कलाकारांच्या यादीत अभिनेत्री दिशा पटाणी (४३ वे स्थान), क्रिती सेनॉन (३८ वे स्थान), सारा अली खान (६६ वे स्थान), कल्की कोएचलिन (९३ वे स्थान) आणि सैफ अली खान (७४ वे स्थान) यांच्या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा -चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल

टीव्ही कलाकारांपैकी कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्याही नावाचा या यादीत समावेश आहे. टीव्ही माध्यमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांमध्ये त्याने बाजी मारली आहे. तर, 'ये है मोहोबत्ते' फेम दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण कुंद्रा, कॉमेडी क्विन भारती सिंग यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.

Intro:Body:

भाईजानला मागे टाकत विराट कोहली बनला सर्वात महागडा स्टार, फोर्ब्सच्या यादीत पटकावले पहिले स्थान

मुंबई - जगप्रसिद्ध अमेरिकन मॅगझिन फोर्ब्सची यंदाची यादी प्रकाशित झाली आहे. यामध्ये १०० प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या यादीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सलमान खानला कमाईच्या बाबतीत मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान हे भारतातले सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी अव्वल स्थानावर आहेत. मात्र, विराट कोहलीने या दोघांनाही मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.

१ ऑक्टोंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत आपल्या व्यक्तीमत्वाने प्रभावित करणाऱ्या व्यक्ती तसेच, सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या कलाकारांना फोर्ब्सच्या १०० सेलिब्रिटींमध्ये स्थान मिळते. अक्षय कुमारची यंदाची कमाई २९३.२५ कोटी आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत त्याच्या कमाईत तब्बल ५८.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. अक्षयला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. तर, सलमान खानची यंदाची कमाई २२९.२५ कोटी इतकी आहे. त्याला तिसरे स्थान मिळाले आहे.

महानायक अमिताभ बच्चन  आणि महेंद्रसिंग धोनी हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची कमाई २३९.२५ कोटी आणि १३५.९३ कोटी इतकी आहे. किंग खान शाहरुख हा सहाव्या स्थानावर तर, रणवीर सिंग हा सातव्या क्रमांकावर आहे.

यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या नावाचा समावेश आहे. आलिया भट्टची कमाई ५९.२१ कोटी आहे. तिला आठवे स्थान मिळाले आहे. तर, दीपिका पदुकोणची कमाई ही ४८ कोटी आहे. ती दहाव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरची कमाई ७६.९६ कोटी आहे. त्याला ९ वे स्थान मिळाले आहे.  

टॉप १०० कलाकारांच्या यादीत अभिनेत्री दिशा पटाणी (४३ वे स्थान), क्रिती सेनॉन (३८ वे स्थान), सारा अली खान (६६ वे स्थान), कल्की कोएचलिन (९३ वे स्थान) आणि सैफ अली खान (७४ वे स्थान) यांच्या नावाचा समावेश आहे.

टीव्ही कलाकारांपैकी कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्याही नावाचा या यादीत समावेश आहे. टीव्ही माध्यमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांमध्ये त्याने बाजी मारली आहे. तर, 'ये है मोहोबत्ते' फेम दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण कुंद्रा, कॉमेडी क्विन भारती सिंग यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.