मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'एबीसीडी' चित्रपटाचाच हा तिसरा भाग आहे. रेमो डिसुजा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. त्यापूर्वी यातील कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत.
वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो.
![varun](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5391794_st3.jpg)
![shraddha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5391794_st2.jpg)
![prabhu deva](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5391794_st1.jpg)
![nora](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5391794_st4.jpg)
हेही वाचा -'दिल दोस्ती दुनियादारी'तील 'अॅना' लवकरच अडकणार लग्नबंधनात
१८ डिसेंबरला ट्रेलर रिलीज होतोय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. २५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -रजनीकांतच्या 'दरबार'चे नवे पोस्ट रिलीज, आज प्रतीक्षा ट्रेलरची