ETV Bharat / sitara

'तुफान' चित्रपटानंतर फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया - Farhan Akhatar in News

'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Farhan Akhtar to wed With Shabani? what Javed Akhtar said
'तुफान' चित्रपटानंतर फरहान - शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 13, 2020, 7:50 PM IST

मुंबई - अभिनेता फरहान अख्तर सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासोबतच फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर यांच्या नात्याच्या चर्चांनाही बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. 'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

फरहान आणि शिबानी यांच्या नात्याबाबत जावेद अख्तर यांना विचारले असता, 'मला ही बातमी तुमच्याकडूनच समजत आहे. मी फरहानच्या वाढदिवशी पूर्ण वेळ त्याच्यासोबत होतो. पण, त्याने याबाबत मला काहीही सांगितले नाही. तुम्हाला माहित नाही, आजकालची मुले त्यांची गुपीतं फार जपतात', असे जावेद म्हणाले.

हेही वाचा -मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

मीडिया रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी यावर्षी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या विवाहसोहळ्याच्या तारखा देखील निवडून ठेवल्या आहेत. 'तुफान' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते दोघं लग्न करणार असल्याची दाट शक्यता कलाविश्वात वर्तवण्यात येत आहे.

जावेद अख्तर यांनाही शिबानी पसंत असल्याचे बोलले जात आहे. तिच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की 'मी शिबानीला खूप वेळा भेटलो आहे. ती खूप गोड मुलगी आहे'.

हेही वाचा -अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची दिग्दर्शनात एन्ट्री, 'व्हॅलेन्टाईन्स डे'ला देणार खास भेट

फरहान अख्तरने शिबानीपूर्वी हेअरस्टायलिस्ट अधुना भाबनीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्याला शाक्या आणि अकिरा या दोन मुली देखील आहेत.

Intro:Body:

'तुफान' चित्रपटानंतर फरहान - शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई - अभिनेता फरहान अख्तर सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याचा आगामी 'तुफान' चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासोबतच फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर यांच्या नात्याच्या चर्चांनाही बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. 'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. 

फरहान आणि शिबानी यांच्या नात्याबाबत जावेद अख्तर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांच्या नात्याबाबत माध्यमाशी बोलताना जावेद म्हणाले, की 'मी ही बातमी तुमच्याकडूनच समजत आहे. मी फरहानच्या वाढदिवशी पूर्ण वेळ त्याच्यासोबत होतो. पण, त्याने याबाबत मला काहीही सांगितले नाही. तुम्हाला माहित नाही, आजकालची मुले त्यांची गुपीतं फार जपतात'.

मीडिया रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानी यावर्षी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या विवाहसोहळ्याच्या तारखा देखील निवडून ठेवल्या आहेत. 'तुफान' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते दोघं लग्न करणार असल्याची दाट शक्यता कलाविश्वात वर्तवण्यात येत आहे.  

जावेद अख्तर यांनाही शिबानी पसंत असल्याचे बोलले जात आहे. तिच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की 'मी शिबानीला खूप वेळा भेटलो आहे. ती खूप गोड मुलगी आहे'. 

फरहान अख्तरने शिबानीपूर्वी हेअरस्टायलिस्ट अधुना भाबनीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्याला शाक्या आणि अकिरा या दोन मुली देखील आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.