ETV Bharat / sitara

वेबसीरिजमुळे ट्रोल झालेल्या एकताने सोडले मौन; म्हणाली, सैन्याबद्दल मनापासून आदर - ट्रिपल एक्सच्या वादावर एकताची प्रतिक्रिया

एकताने सांगितले की, एक व्यक्ती म्हणून आणि एक संघटना म्हणून आम्ही भारतीय सैन्याबद्दल मनापासून आदर बाळगतो. आपले हित आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे अफाट योगदान आहे. ज्या दृश्यांबद्दल बोलले जात आहे ती दृश्ये आम्ही आधीच हटवली आहेत.

Ekta Kapoor On Triple X Controversy
वेबसीरिजमुळे ट्रोल झालेल्या एकताने सोडले मौन
author img

By

Published : Jun 7, 2020, 3:13 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माती एकता कपूर आपल्या एका वेबसीरिजमधील सीनमुळे अडचणीत आली आहे. सीरिजमधील एका सीनमुळे भारतीय सैनिकांचा अपमान होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. यानंतर एकताला सोशल मीडियावर धमक्या आणि घृणास्पद टिप्पण्यांचा सामना करावा लागत आहे. आज एकताने शोभा डे यांच्याशी बोलताना या विषयाला वाचा फोडली.

वेबसीरिजमुळे ट्रोल झालेल्या एकताने सोडले मौन

शोभा डे यांनी एकताला ती सोशल मीडियावर सहन करत असलेल्या द्वेष आणि संतापाबद्दल विचारले तेव्हा एकताने सांगितले की, एक व्यक्ती म्हणून आणि एक संघटना म्हणून आम्ही भारतीय सैन्याबद्दल मनापासून आदर बाळगतो. आपले हित आणि सुरक्षिततेसाठी त्यांचे अफाट योगदान आहे. ज्या दृश्यांबद्दल बोलले जात आहे ती दृश्ये आम्ही आधीच हटवली आहेत. याबाबत आमच्या बाजूने योग्य ती कारवाई केली गेली आहे. मात्र, ट्रोर्ल्सकडून धमकावले जाणे आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जाणे निश्चितच खेदजनक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.