हॉलिवूडचा 'द लॉयन किंग' चित्रपट हिंदी व्हर्जनमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य पात्र 'लॉयन किंग'ला शाहरुख खानचा आवाज मिळणार आहे. तर, 'सिंबा'च्या पात्राला शाहरुखचा मुलगा आर्यनचा आवाज मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रटातील इतर पात्रांनाही बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराचा आवाज लाभणार आहे. कोणत्या पात्राला कोणाचा आवाज मिळणार याची माहिती समोर आली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती शेअर केली आहे.
द लॉयन किंगच्या 'स्कार' या पात्राला अभिनेते आशिश विद्यार्थी यांचा आवाज मिळणार आहे.
श्रेअस तळपदे हा 'टिमॉन'च्या पात्राला आवाज देणार आहे.
संजय मिश्रा हे 'पुंबा' या पात्राला आवाज देणार आहे.
आसरानी हे 'जाजू' या पात्राला आवाज देणार आहेत.
हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.