ETV Bharat / sitara

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’! - ‘बाईपण भारी देवा’ २८ मे ला रिलीज होणार

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘नो टेन्शन, फुल्ल टशन’ अशी त्या चित्रपटाची टॅग-लाईन असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटाचे नाव ‘बाईपण भारी देवा’ असून त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

baipan-bhari-deva
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा
author img

By

Published : Mar 24, 2021, 12:10 PM IST

मुंबई - ३ वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘नो टेन्शन, फुल्ल टशन’ अशी त्या चित्रपटाची टॅग-लाईन असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटाचे नाव ‘बाईपण भारी देवा’ असून त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाटक, टीव्ही मालिका किंवा चित्रपट माध्यम असो, मराठी प्रेक्षकांच्या आवडीची नस दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘सही’ पकडलेली आहे. सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध संवेदनशील विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मिडियावर प्रदर्शित झाले.

baipan-bhari-deva
चित्रपटाचे पोस्टर
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा प्रेक्षक सहकुटुंब आस्वाद घेतात. ‘बाईपण भारी देवा’ अशा वेगळ्या नावामुळे लक्षवेधून घेणार्‍या या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन’ या कॅच लाईनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढली आहे. निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती आहे. स्क्रीनशॉटस् या निर्मिती संस्थेचे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण होत आहे. परंतु टीव्ही, ओटीटी, ब्रॅंडेड कंटेंट, ऑडिओ आदि माध्यमक्षेत्रात स्क्रीनशॉटस् संस्थेने अल्पावधीत दर्जेदार कलाकृती मधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २०२१ यावर्षांमध्ये संस्था अजून काही प्रोजेक्टस घेऊन येणार असल्याचेही निर्मात्या माधुरी भोसले यांनी सांगितले.आपल्या सभोवताली सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नकारात्मक परिस्थिती विसरायला लावणारे निखळ कौटुंबिक मनोरंजन दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' मधून घडणार आहे. या चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे.केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा' २८ मे २०२१ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची तयारी करतोय. हेही वाचा - सावनी रविंद्रला ‘बार्डो’ मधील ‘रान पेटलं' गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.