मुंबई - छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील सर्वच कलाकार या मालिकेमुळे प्रसिद्ध झाले. यातीलच एक कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. त्यांच्यानंतर आता 'अॅना'ची भूमिका साकारणारी
पूजा ठोंबरे ही देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -हव्वा आपलीच रं... ट्रेलरने उडवला 'धुरळा'
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत पूजाने साकारलेली 'अॅना'ची भूमिका तरुणाईच्या फारच पसंतीस पडली होती. आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोड हास्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १४ डिसेंबरलाच तिचा नाशिकच्या नामपूर येथील कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दोघांनीही आपल्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साखरपुड्यावेळी पूजाचा खास मराठमोळा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या फोटोवर चाहत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर काही तासातच होणार प्रदर्शित