ETV Bharat / health-and-lifestyle

आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मेणासारखं वितळेल बॅड कोलेस्ट्रॉल - FOOD THAT REDUCE CHOLESTEROL

कोलेस्ट्रॉलचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्या नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या कोणते पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Food That Reduce Cholesterol
कोलेस्ट्रॉल (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Dec 4, 2024, 8:39 AM IST

Updated : Dec 4, 2024, 11:27 AM IST

Food That Reduce Cholesterol: कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शरीरासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरू शकतो. असंच कॅालेस्ट्रॅालचं सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा बॅड कोलेस्ट्रॉल. शरीरात बॅड केलेस्ट्रॉल वाढू लागल्यास गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण यामुळे हृदविकाराचा झटका, स्ट्रोक सारख्या घातक आजारांचा धोका वाढतो. परंतु, आरोग्यदायी आहाराचा अवलंब केल्यास तुम्ही या समस्येपासून स्वतःची मुक्तता करू शकता. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यानं तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रभावीपणे सामना करण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करणारे पदार्थ कोणते.

  • ओट्स: ओट्समध्ये कोलेस्ट्रॉल वितळवणारे फायबर पुरेशा प्रमाणात आढळतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. 'अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, रिकाम्या पोटी ओट्सचं सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी 5-10% कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये नियमितपणे ओट्सचा समावेश करू शकता. चांगल्या परिणामाकरिता साखरयुक्त ओट्स टाळणे चांगले.
  • चिया सीड्स: चिया सीडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आण्विक पोषण आणि अन्न संशोधनामध्ये प्रकाशित 2017 च्या अभ्यासात असं आढळून आलं की, चिया सीडचे नियमित सेवन एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी भिजवलेल्या चिया सीड्स रिकाम्या पोटी सेवन करावं.
  • लसूण: कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. त्यातील उच्च सल्फर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. दररोज सकाळी 2 लसणाच्या पाकळ्या सोलून कच्च्या खा. यामुळे रक्तात साचलेली खराब चरबी कमी करण्यास मदत होते.
  • नट्स: नट्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. नट्स खाल्ल्याने हृदयाचं आरोग्यही सुधारते. त्यामुळे बदाम, अक्रोड, पिस्ता यासारखे नट्स नियमितपणे खाऊ शकता.
  • हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. त्याचे दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यकृताचे कार्य सुधारण्यासाठीही हळद फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी कोमट पाण्यात थोडी हळद आणि लिंबाचा रस घालून रिकाम्या पोटी खाऊ शकता.
  • ग्रीन चहा: ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल असतात. हे आतड्यांतील कोलेस्टेरॉलचे शोषण रोखते आणि चयापचय सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी एक कप ग्रीन टी प्यायल्यानं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' व्यक्तींसाठी नाचणी आहे घातक? ..तर, तुमच्या आहारातून आजच टाळा
  2. दिवसातून 20 हजार पावलं चालल्यास होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
  3. डाळिंबाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
  4. सकाळी सूर्यप्रकाशात बसल्यास आरोग्याला होतात अफाट फायदे; जाणून घ्या कोणती वेळ आहे उत्तम
  5. गुडघेदुखीसाठी उत्तम आहेत 'हे' पदार्थ; गुडघेदुखी होईल छुमंतर

Last Updated : Dec 4, 2024, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.