हैदराबाद : Piaggio Vehicles Pvt Ltd नं एप्रिलिया अंतर्गत त्याच्या एंट्री-लेव्हल मोटरसायकलच्या किंमत वाढवण्याची घोषणा केलीय. या दुचाकीच्या किंमतीत दरवाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. पुढील वर्षी दुचाकीची किंमत 10 रुपयानं वाढण्याची घोषणा कंपनीनं केलीय. Aprilia RS457 आता 4.20 लाख, एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करता येतेय. RS457 एकूण तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात प्रिझमॅटिक डार्क, ऑपेलेसेंट लाइट आणि रेसिंग स्ट्राइप्स रंगाचा समावेश आहे.
Aprilia RS457 ला अभूतपूर्व प्रतिसाद : याबाबत Piaggio Vehicles Pvt Ltd डोमेस्टिक बिझनेस हेड अजय रघुवंशी म्हणाले, “Aprilia RS457 दुचाकी लॉंच झाल्यापासून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं आमची प्रॉडक्शन लाइन्स अतिशय व्यस्त आहे. बाइकला मिळालेल्या स्वीकृतीबद्दल आम्ही नागरिकांचे कृतज्ञ आहोत. उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि आश्चर्यकारक डिझाइन व्यतिरिक्त, ग्राहक वाहन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या पार्टचं देखील कौतुक करताय. आमचं लक्ष अधिक मोठ्या ग्राहकांचं सर्वोत्तम नेटवर्क विस्तारण्यावर आहे.”
जानेवारी 2025 पासून वाढ लागू : मात्र, 2024 मध्ये ही दुचाकी खरेदी स्वस्तात खरेदी करण्याची स्पोर्ट्स बाईकप्रेमींना संधी आहे. त्यांनी भारतात कुठंही त्यांच्या जवळच्या Aprilia RS457 डीलरशिपकडं जावून 31 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांच्या पसंतीच्या RS457 दुचाकीवर सुट मिळवावी. या दुचाकीवर सध्या 5 हजारांची सुट मिळतेय. कारण जानेवारी 2025 पासून या दुचाकीची किंमत दहा हजारांनं वाढवण्याची घोषणा कंपनीनं केलीय.
हे वाचलंत का :