बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून 'दीपवीर' म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी चर्चेचा विषय ठरली. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच दोघांनी लग्नगाठ बांधली. रणवीर नेहमीप्रमाणेच लग्नानंतरही प्रचंड उत्साही असल्याचे पाहायला मिळते. तो जेथेही जाईल तिथे त्याच्या एनर्जीने सर्वांवर छाप पाडतो. त्याच्या या एनर्जीमागचे नेमके गुपीत काय याचा खुलासा दीपिकाने केला आहे.
लग्नानंतर दीपिका आणि रणवीर दोघांनीही बऱ्याच माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. त्यांचे लग्नानंतरचे आयुष्य कसे सुरु आहे, याबाबत चाहत्यांनाही जाणून घ्यायचे असते. त्यामुळे रणवीरचे घरातले वागणे कसे आहे. त्याचा उत्साह नेहमी कशामुळे टिकून राहतो, याबद्दल दीपिकाने चर्चा केली.
एका माध्यमाशी बोलताना दीपिका म्हणाली, की 'मी रणवीरला सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी बदाम आणि नारळपाणी देत असते. हेच त्याच्या एनर्जीचे रहस्य आहे. त्याच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कामाच्या बाबतीतही तो अत्यंत चोख असतो. एखाद्या भूमिकेत तो एकरुप होतो. तो अत्यंत संवेदनशील आहे. लहान मुलांसारखा निरागस देखील आहे', असेही तिने सांगितले.
लग्नानंतर रणवीरचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. दीपिकाही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती 'छपाक' या चित्रपटात झळकणार आहे. तर रणवीर सिंग हा '८३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.