ETV Bharat / sitara

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी दीपिका पदुकोणला मिळाला पुरस्कार - Awareness of mental health programme

काही महिन्यांपूर्वीच दीपिका पदुकोणने मानसिक आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यासाठी तिला २६ वा वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

wins crystal award for spreading Awareness of mental health
मानसिक आरोग्य जागरुकतेसाठी दीपिका पदुकोणला मिळाला पुरस्कार
author img

By

Published : Dec 14, 2019, 10:15 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सहभागी होत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने मानसिक आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यासाठी तिला २६ वा वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार स्वीकारताना दीपिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'दरवर्षी ३० कोटीपेक्षा अधिक लोक डिप्रेशन या आजारामुळे ग्रस्त होतात. आरोग्याबाबत दुर्लक्ष आणि मानसिक तणाव या गोष्टी डिप्रेशनसाठी कारणीभूत असतात. यामुळे इतरही आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजात मानसिक आरोग्य जनजागृतीची गरज असल्याचं दीपिका यावेळी म्हणाली.

हा पुरस्कार तनाव, काळजी आणि मानसिक रोगांचा सामना करणाऱ्या जगभरातील लोकांना मी समर्पित करते, असेही ती म्हणाली.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, दीपिका लवकरच 'छपाक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अ‌ॅसिड हल्ल्यातून पुन्हा नवी भरारी घेणारी लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाचीही आतुरता आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

मानसिक आरोग्य जागरुकतेसाठी दीपिका पदुकोणला मिळाला पुरस्कार

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सहभागी होत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने मानसिक आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यासाठी तिला २६ वा वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

हा पुरस्कार स्विकारताना दीपिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'दरवर्षी ३० कोटीपेक्षा अधिक लोक डिप्रेशन या आजारामुळे ग्रस्त होतात. आरोग्याबाबत दुर्लक्ष आणि मानसिक तणाव या गोष्टी डिप्रेशनसाठी कारणीभूत असतात. यामुळे इतरही आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजात मानसिक आरोग्य जनजागृतीची गरज असल्याचं दीपिका यावेळी म्हणाली. 

हा पुरस्कार तनाव, काळजी आणि मानसिक रोगांचा सामना करणाऱ्या जगभरातील लोकांना मी समर्पित करते, असेही ती म्हणाली.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, दीपिका लवकरच 'छपाक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अ‌ॅसिड हल्ल्यातून पुन्हा नवी भरारी घेणारी लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाचीही आतुरता आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.