मुंबई - आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडला मिळालेला नवा चेहरा म्हणजे जायरा वसीम. तिच्या अभिनयाने तिने पहिल्याच चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जायराने बॉलिवूडमधुन एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जायराने 'दंगल' चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातही ती झळकली. या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 'दंगल' चित्रपटाने तर चीनमध्येही बॉक्स ऑफिस गाजवले. असे असुनही तिने हा निर्णय का घेतला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोशल मीडियावर जायराने एका पोस्टद्वारे तिचा निर्णय जाहीर केला आहे. 'अल्लाह के रास्ते से भटक गई थी' असे तिने या पोस्टमध्ये लिहले आहे. 'पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण एवढ्या लहान वयात मी एवढा मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे', असे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
लवकरच तिचा 'स्काय इज पिंक' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. जर तिने बॉलिवूडमधुन खरोखर एक्झिट घेतली, तर तिचा हा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट ठरेल.