ETV Bharat / sitara

ग्रामीण कथा, क्रिकेट, उत्तम संवाद आणि जबरदस्त अभिनय याने नटलेला 'फ्री हिट दणका’! - फँड्री फेम सोमनाथ अवघडेचा नवा सिनेमा

क्रिकेटवर आधारित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने अधिकच वाढली आहे.

फ्री हिट दणका
फ्री हिट दणका
author img

By

Published : Dec 6, 2021, 4:32 PM IST

आपल्या देशात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने अधिकच वाढली आहे.

उघडेवाडी गावातील धुमाकुळ पाटील आणि निगडेवाडी गावातील अण्णा पाटील या दोन पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकुळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम असते. आता या दोघांच्या प्रेमाचे भविष्य या दोन गावांमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेवर अवलंबून आहे. या दोघांचे प्रेम कसे जुळते, त्यांच्या प्रेमाचे पुढे नक्की काय होते आणि या दोन गावांमध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वैमनस्य आहे या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना ‘फ्री हिट दणका' चित्रपटातून मिळतील.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे सोबत या चित्रपटात अपूर्वा एस. आहे. विशेष म्हणजे 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.

नुकताच ‘फ्री हिट दणका' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. ग्रामीण कथा, क्रिकेट, उत्तम संवाद, जबरदस्त अभिनय या सगळ्यांमुळे चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे गाजत आहे. चित्रपटाचा ट्रेलर जसाजसा पुढे जातो तशीतशी चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढत जाते. ‘फ्री हिट दणका' येत्या १७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - देवमाणूसचे ‘पुनश्च हरिओम’, 'देवमाणूस२' चे चित्रीकरण झाले सुरु!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.