मुंबई - कार्तिक आर्यन आणि किर्ती सेनन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात कार्तिक आणि किर्ती यांच्या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्यांच्या लग्नाची मनोरंजक कथा दाखवण्यात आली आहे. आता नुकतेच या चित्रपटातील 'कोका कोला तू' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या गाण्याची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. 'कोका कोला तू' असे शीर्षक असलेल्या या गाण्यात किर्ती सेनन आणि कार्तिक आर्यनचा धमाल डान्स पाहायला मिळत आहे. हे एक पार्टी साँग असून गाण्याला नेहा कक्कर, तनिष्क बागची आणि टोनी कक्कर यांनी आवाज दिला आहे.
'लुका छुपी' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि किर्ती सेननशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा आणि विनय पाठक यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.