मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका 'चला हवा येऊ द्या'ने महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. या मालिकेतल्या कलाकारांनीही घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. निलेश साबळेने मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. त्याचा सहकलाकार कुशल बद्रिके याने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशलने निलेश साबळेसाठी एक पोस्टही लिहिली आहे. 'काही वर्षांपूर्वी पनवेलच्या बस स्टॉपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईतल्या स्वत:च्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा. डॉ. तुझं अभिनंदन आणि जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीचं खरं कौतुक', असे कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -अनिल कपूरने शेअर केले 'मलंग'चे डॅशिंग पोस्टर
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून निलेश साबळेसह इतरही कलाकारांना भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. सध्या या कार्यक्रमात 'सेलिब्रिटी पॅटर्न' विशेष कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा -सारा अली खान व सावत्र आई करिनामध्ये आहे जबरदस्त बॉंडिंग.. पाहा व्हिडिओ