मुंबई - अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेल्या 'चलते चलते' या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणीमध्ये राणी रमलेली दिसली.
''शाहरुख खानसोबत काम करणे हे अतिशय आवडते काम. हे शाहरुख खानचे प्रॉडक्शन होते आणि मी पहिल्यांदाच ग्रीसमधल्या अथेन्स आणि मायकॉनन्सला भेट देत होते. ही मजेशीर आठवण आहे. ब्लू अँड व्हाईट लँडस्केप असलेले सुंदर घर मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. शूटिंगसाठी आणि राहण्यासाठी हे आयलँड फारच सुंदर होते. अथेन्स येथे चकित करणारे आर्किटेक्चर, हेरिटेज आणि असंख्य ऐतिहासिक गोष्टी होत्या. 'चलते चलते'चे आऊटडोअर फारच कमालीचे होते,'' असे राणी म्हणाली.
'चलते चलते'चे दिग्दर्शन अझिझ मिर्झा यांनी केले होते. २०१३ ला हा सिनेमा रिलीज झाला.
'चलते चलते'नंतर राणीने भारतात स्मोकी आईजचा ट्रेंड सुरू केला. याचे श्रेय ती मिकी कॉन्ट्रॅक्टर या मेकअप आर्टिस्टला देते. एखादी गोष्ट सादर करण्यासाठी त्याचे व्हिजन अत्यंत नवे होते.