ETV Bharat / sitara

"देश रडतोय, देश जळतोय, काहीतरी चुकतंय"

आमची तरुण मुले रस्त्यावर उतरली असतील तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की काही तरी चुकतंय, असे मत मुकेश भट्ट यांनी व्यक्त केलंय. सीएएच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

Mukesh Bhatt
मुकेश भट्ट
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:57 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू अलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. सध्या देश रडत असल्याचे ते म्हणाले.

भट्ट म्हणाले, "मी वैयक्तीकरित्या सीएए बद्दल खूप नाराज आहे.पूर्ण देश रडतोय, पूर्ण देश जळत आहे. अजूनही तुम्ही पाहात नसाल तर हे दुर्दैवी आहे. जर हे आपल्या पूर्ण देशात होत असेल आणि आमची तरुण मुले रस्त्यावर उतरली असतील तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की काही तरी चुकतंय."

आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसेबद्दल बोलताना भट्ट म्हणाले, "मी हिंसेच्या विरोधात आहे परंतु आंदोलकांच्या बाबतीत असे का होतंय याचा विचार सरकारने केला पाहिजे."

यापूर्वी बॉलिवूडचे कलाकार फरहान अख्तर, हुमा कुरैशी, राहुल बोस आणि स्वरा भास्कर यांनी सीएए कायद्याला विरोध दर्शवला होता.

पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश या देशातून २०१४ च्या अगोदर भारतात आलेल्या मुस्लिमेत्तर लोकांना सीएए कायद्यानुसार नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

१९ डिसेंबरला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या हजारोंच्या संख्येने जमलेल्या सीएए विरोधातील आंदोलनात अभिनेत्री स्वरा भास्करनेही सहभाग घेतला होता. या प्रकारच्या कायद्याची आवश्यकता आहे काय असा प्रश्न तिने उपस्थित केला.

स्वरा म्हणाली, "या देशाला सीएए किंवा एनआरसीची काहीच आवश्यकता नाही. आपल्याकडे शरणार्थींना नागरिकत्व देण्याची पध्दत आहे. या आधारावर जर अदनान सामीला नागरिकत्व प्रदान केले जाऊ शकते तर त्याच आधारावर हिंदू शरणार्थींना नागरिकत्व का दिले जाऊ शकत नाही. तुम्हाला घटेत बदल का करायचा आहे?"

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.