ETV Bharat / sitara

हल्लेखोरांना अटक करण्यासाठी अलीशा खानचे पोलिसांना आवाहन - अलिशा खानच्या कुटुंबावर हल्ला

गाझियाबाद येथे राहणारी अभिनेत्री अलिशा खानच्या कुटुंबावर गेल्या आठवड्यात हल्ला झाला होता. यावर अभिनेत्री अलिशा खानने व्हिडीओ प्रसिद्ध करत दोन्ही आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अलीशा खान आणि तिचे कुटुंब गाझियाबादमध्ये स्थायिक झालेल्या गाझीउद्दीनचे वंशज आहेत.

Alisha Khan appeals to Ghaziabad police
अलीशा खानचे पोलिसांना आवाहन
author img

By

Published : Sep 29, 2020, 3:45 PM IST

नवी दिल्ली / गाझियाबाद : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यात राहणारी अभिनेत्री अलिशा खानच्या कुटुंबावर गेल्या आठवड्यात हल्ला झाला. या प्रकरणातील दोन आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. यामुळे अभिनेत्री आणि तिचे कुटुंब खूप घाबरले आहेत. सध्या मुंबईत राहणारी अभिनेत्री अलिशा खानने व्हिडीओ प्रसिद्ध करुन दोन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अलीशा खान आणि त्याचे कुटुंब गाझियाबादमध्ये स्थायिक झालेल्या गाझीउद्दीनचे वंशज आहेत.

अलीशा खानचे पोलिसांना आवाहन

पूर्ण प्रकरण असे आहे

तिच्या घरी चार जण आले आणि अलीशाच्या काकासह कुटुंबातील इतर सदस्यांवर जोरदार हल्ला केला, असा आरोप अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन आरोपींना अटक केली. परंतु उर्वरित दोन आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटल्याने कुटुंबाचे धाबे दणाणले आहेत. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते की, त्यांच्यावर पुन्हा कधीही हल्ला होऊ नये. हा वाद जुन्या मालमत्तेचा आहे, ज्यामध्ये तिचे काही नातेवाईकही आपला दावा सांगत आहेत.

लवकरच अटक होईल, पोलिसांचा दावा

घाबरून जाण्याची गरज नाही, अशी ग्वाही पोलिसांनी कुटुंबीयांना दिली आहे. लवकरच उर्वरित आरोपींनाही अटक केली जाईल. मात्र हा वाद आधीच सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खटल्याच्या सर्व बाबींचीही चौकशी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.