ETV Bharat / sitara

'बीबी नं १' चित्रपटाचे २० वर्षे पूर्ण, करिश्माने शेअर केली खास आठवण - social media

'बिबी नंबर १' या चित्रपटातील लोकप्रिय गाणं 'मिर्ची'दरम्यानचा एक किस्सा करिश्माने सांगितलाय. यासोबतच तिने सलमानसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

'बीबी नं १' चित्रपटाचे २० वर्षे पूर्ण, करिश्माने शेअर केली खास आठवण
author img

By

Published : May 30, 2019, 1:30 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि करिश्मा कपूर यांची जोडी एकेकाळी सुपरहिट जोडी ठरली होती. या दोघांनी आजवर बरेचसे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांचा लोकप्रिय ठरलेला एक चित्रपट म्हणजेच 'बीबी नं १'. या चित्रपटाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त करिश्माने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'बिबी नंबर १' या चित्रपटातील लोकप्रिय गाणं 'मिर्ची'दरम्यानचा एक किस्सा करिश्माने सांगितलाय. यासोबतच तिने सलमानसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट असलेल्या या फोटोमध्ये सलमान आणि करिश्मा दोघेही दिलखुलासपणे हसताना दिसत आहेत. तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो या चित्रपटाच्या जाहिरातीचा आहे. यामध्येही सलमान आणि करिश्मा चित्रपटातील भूमिकेत दिसत आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. यामध्ये सुश्मिता सेनही सलमान खानच्या गर्लफ्रेन्डच्या रूपात झळकली होती. तिनेही या चित्रपटाची आठवन सोशल मीडियावर शेअर केली आहे. १९९९ साली बिबी नंबर वन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने त्यावर्षी सर्वाधिक कमाई केली होती. सिनेमागृहातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

Intro:Body:

ENT 08

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.