मुंबई - आयुष्यमान खुराणा त्याच्या दर्जेदार अभिनयासोबतच दर्जेदार कवितांबद्दलही ओळखला जातो. मात्र यावेळी त्याने स्वरचित कविता सादर न करता बनारसच्या कवयित्री निती पांडे यांची 'इस दौर की कविता' असे शीर्षक असलेली कविता सोशल मीडियावर सादर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निती पांडे यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या कवितेचा मराठीत भावानुवाद असा आहे....
![Poem by Niti Pande](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6572269_poem.jpeg)
या कवितेतून आयुष्यमान खुराणाने लोकांना घरी राहण्याचे आवाहन केलंय. अशा प्रकारे लोकांच्या घरी थांबा असे सांगणारा आयुष्यमान पहिला नाही. कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेकांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार सेल्फ-आइसोलेशन, सेल्फ-क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहात आहेत. यात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कैटरीना कैफ, प्रियंका चोपड़ा, शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे