मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची मुख्य जोडी असलेला 'दम लगाके हैशा' या चित्रपटाला आज पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातून भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटातच भूमीने स्थूल शरीर असलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आयुष्मान आणि भूमीच्या चित्रपट करिअरला नवी कलाटणी मिळाली.
भूमीने 'दम लगाके हैशा' या चित्रपटासाठी तब्बल ३० किलो वजन वाढवले होते. या चित्रपटानंतर आयुष्मान आणि भूमीच्या जोडीची भरपूर प्रशंसा झाली होती. या चित्रपटानंतर दोघेही 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटातही दोघांच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भूमीचा आत्ताचा जर लुक पाहिला तर, 'दम लगाके हैशा' चित्रपटातील हिच ती भूमी का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण, भूमीने आपल्या लुकवर प्रचंड मेहनत घेत आता एकदम फिटेस्ट अभिनेत्री बनली आहे. फॅट टू फिटच्या या प्रवासात कधी तिने आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीचीही भूमिका साकारली. 'सांड की आँख' या चित्रपटात ती शूटर दादीच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटातही तिचा लुक सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता.
हेही वाचा -'ती' गोष्ट आठवली की अजूनही भीती वाटते, भाग्यश्रीने शेअर केली कटू आठवण
काही महिन्यांपूर्वीच भूमी आणि आयुष्मान पुन्हा एकदा 'बाला' चित्रपटात दिसले. या चित्रपटात भूमीने पुन्हा हटके भूमिकेची निवड करत सावळ्या रंगाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पडद्यावर फक्त ग्लॅमरस भूमिकेत न दिसता तिने नेहमी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अलिकडेच ती विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटात झळकली.
दुसरीकडे आयुष्मानही लोकप्रियतेचे शिखर गाठत आहे. बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देत त्याने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली आहे. यावर्षी तो आपल्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -बॉलिवूडचा 'हा' अभिनेता आहे बिग बींचा 'फेवरेट', शेअर केला जुना फोटो
दरम्यान त्यांच्या 'दम लगाके हैशा' या चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.